राज्य मध्यवर्ती ग्रंथालय

राज्याच्या सार्वजनिक ग्रंथालय पद्धतीची शिखर संस्था म्हणून भूतपूर्व मुंबई सरकारच्या काळात मुंबई ग्रंथालय विकास समितीच्या शिफारसीनुसार राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा 1947 मध्ये देण्यात आलेले हे मध्यवर्ती ग्रंथालय करारान्वये रॉयल एशियाटिक सोसायटीकडे चालविण्यासाठी सुपूर्द केले होते ते दि. 1/07/1994 पासून एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतले आहे व राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. ग्रंथ प्रदान कायदा, 1954 अन्वये भारतात प्रकाशित होणारे सर्व भाषेतील ग्रंथ व नियतकालिके प्रकाशकांतर्फे या ग्रंथालयास प्राप्त होतात. त्याचप्रमाणे मुद्रण व ग्रंथ नोंदणी कायदा, 1867 अन्वये मुद्रकातर्फे पाठविण्यात येणारे मराठी ग्रंथ देखील या ग्रंथालयात जतन करून ठेवण्यासाठी व संदर्भासाठी प्राप्त होतात. भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाचे "प्रादेशिक केंद्र" म्हणून या ग्रंथालयाला भारत सरकारची मान्यता आहे. राज्यातील व भारतातील कोणत्याही नागरिकास संदर्भ व संशोधनासाठी या ग्रंथलायाचा विनामूल्य फायदा घेता येतो. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या सहकार्याने समृद्ध बाल विभाग उभारण्यात आला आहे. त्याचा लाभ बालकांना होतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ग्रंथालयात बसून अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुष्करम मेळा
पुष्करम्‌ मेळा दर बारा वेगवेगळ्या नद्यांच्या काठी भरणारा स्नान महात्म्य असलेला उत्तर भारतातील
युनिक फीचर्स
युनिक फीचर्स ही विविध वृत्तमाध्यमांना संपादकीय मजकूर पुरवणारी मराठीतील पहिली माध्यम संस्था आहे
पूर्व मावळी बोलीभाषा
पूर्व मावळी बोलीभाषा ही पुणे जिल्ह्यातील पूर्व मावळ या विभागातील पूर्वभागातील मागील पिढीतील
खासगीपणा
व्यक्ति, गट किंवा समुहास स्वतःस अथवा स्वतःबद्दलच्या माहितीस एकटे/वेगळे अथवा मर्यादीत ठेवणे; नेमक्या
बुद्धिप्रामाण्यवाद
विवेक प्रामाण्यवाद, भौतिकवाद
रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ
शाहिरी-पोवाडा, तमाशा, भजन-कीर्तन, दशावतार, खडी गंमत, नाटक, चित्रपट ही महाराष्ट्राची सांस्कृतिक
परलोकैषणा
म्हणजे मृत्यूनंतर परलोकात चांगले स्थान मिळविण्याची
धनैषणा
म्हणजे उपजीविका चालण्यासाठी आवश्‍यक असणारे धन मिळविण्याची
कोकणा बोलीभाषा
महाराष्ट्रातील वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरातेत डांग, नवसारी
विनोबा भावे
विनायक नरहर भावे, विनोबा भावे नावाने लोकप्रिय, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते